Ad will apear here
Next
दैनंदिन आरोग्य-गाथा
आयुर्वेदानुसार स्वास्थ्य कसे सांभाळावे याचे मार्गदर्शन डॉ. सुभाष रानडे आणि डॉ. राजेंद्र देशपांडे यांनी या पुस्तकातून केले आहे.

प्रारंभी त्यांनी आयुर्वेदानुसार प्रकृतीची ओळख करून घेण्यास सांगितले आहे. दिवसाची सुरुवात कशी करावी, दातांचे आरोग्य, मलविसर्जन, अभ्यंग स्नान अशा दिवसाच्या सुरुवातीचे महत्त्व समजावून सांगितले आहे. व्यायाम, योग, प्राणायाम यांची माहिती करून दिली आहे. आहारशास्त्र, मीठ, साखरेसारखे घटक त्याचबरोबर फळभाज्या, पालेभाज्या, धान्ये, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, दूध, पनीर आणि मांसाहार यांची माहिती दिली आहे.

प्रकृतीनुसार आहार, आयुर्वेदिक वनस्पतींची ओळख, वृक्षांची पाने व सालांपासून बनवली जाणारी औषधे याबद्दल स्वतंत्र विभागातून माहिती मिळते. ऋतूनुसार आरोग्य कसे सांभाळावे याचा सल्ला दिला आहे. आजार होऊ नये, यासाठी काय करावे आणि आजार झालाच तर काय करावे, याबद्दलही पुस्तकात मार्गदर्शन आहे.   

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : ३६५  
किंमत : २७५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXLBQ
Similar Posts
संस्कृत-मराठी-इंग्लिश शब्दकोश संस्कृत शब्दांचे अर्थ मराठीत व इंग्रजीत एकत्र देणारा हा पहिलाच शब्दकोश आहे. यामध्ये शब्दाच्या अर्थाशिवाय व्याकरणाच्या दृष्टीने त्याची नामलिंग, सर्वनाम, विशेषण, अव्यय, गण, धातू यांची माहितीही कंसात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोहोंसाठी तो उपयुक्त ठरावा.
श्री गुरुलीलामृत श्री अक्कलकोट महाराज यांची महती व माहिती सर्वदूर पोचलेली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची कायम रीघ असते. भक्तांच्या पाठीशी कायम उभे असलेल्या स्वामी सामर्थ्यांच्या लीला कै. गोपाळराव विद्वांस यांनी ‘श्री गुरुलीलामृत (कथासारासह)’ या एकवीस अध्यायी पोठीतून कथन केल्या आहेत.
अभ्यास कसा कराल शालेय जीवनात अभ्यास करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे नेमून दिलेले कामच असते; पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होते. करू, घाई काय एवढी, असे म्हणत चालढकल केली जाते. काही वेळा, तर आपल्याला सर्व काही येते हा आत्मविश्वासच घाताचे कारण दिसते.
अनमोल सणांच्या गोष्टी आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्त्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपल्या सण-उत्सवांची माहिती दिली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language